Post Header
वर्षभर, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. OTW ची आर्थिक क्रियाकलाप अधिक चांगल्या प्रकारे परावर्तित करण्यासाठी संघाने खात्यांच्या लेखांकन रचनाध्येही सुधारणा केली. सध्या, २०२१ च्या आर्थिक विधानांच्या लेखापरीक्षा ची तयारी चालू आहे!
टीम २०२२ च्या अर्थसंकल्प अद्यतनवर परिश्रमपूर्वक काम करत आहे व अभिमानाने तुमच्या समोर मांडू इच्छितो
(अजून तपशीलवार माहिती साठी २०२२ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश):
२०२२ खर्च
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह)
- एकूण US$३,७६,१८६.४४ पैकी या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत, US$२,९०,६८८.२५ खर्च केले गेले आहेत.
- OTW च्या सर्व खर्चापैकी, ६६.८% AO3 च्या देखभाली मध्ये जातात. मुख्य-संगणक खर्चाच्या मोठ्या वाट्याचा यामध्ये समावेश आहे—नवीन खरेदी आणि चालू मुख्य-संगणक केंद्र व देखभाल हे दोन्ही—वेबसाईट कामगिरी देखरेखीची साधने, आणि तांत्रिक व्यवस्था समिती संदर्भातील कामगिरी परवाने, तसेच खाली ठळक केलेले खर्च (सर्व कार्यक्रमांचा खर्च प्रवेश).
- AO3 च्या यावर्षीच्या अद्यतनित अंदाजित US$४२,०००.०० हा AO3 साइट रहदारी वाढ कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी तसेच विद्यमान उपकरणे बदलण्यासाठी सर्व्हर क्षमतेच्या माफक विस्तारासाठी आहे.
फॅनलोर
- US$१९,२७६.९० यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत, US$१४,५६४.४० खर्च झाला आहे.
- फॅनलोर खर्चाचे वाटप हे, विकीसाठी उद्धरण, मुख्य संगणकाचे वाटप, देखभाल व मुख्य संगणक केंद्र खर्च, असे आहे. (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती)
- US$२,३४९.०० यांमधून, US$२७५.०० हे या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत खर्च झाले आहेत.
- TWC चा खर्च ही जर्नलची वेबसाइट होस्टिंग, प्रकाशन आणि संचयन शुल्क आहे (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प)
- US$३,४५९.९८ यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत, US$१,२३४.४२ खर्च झाले आहेत.
- रसिक-मुक्तद्वार प्रकल्पच्या खर्चामध्ये आयातित रसीकृती संग्रहासाठी होस्टिंग, बॅकअप आणि डोमेन खर्च, रसिककृती जतन करण्याशी संबंधित शिपिंग खर्च आणि तिकीट सॉफ्टवेअर, हे समाविष्ट आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
Legal Advocacy (कायदेविषयक मदत)
- US$४,०००.०० यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत, US$०.०० खर्च झाले आहेत.
- कायदे-विषयक मदतीच्या खर्चामध्ये फाइलिंग फी आणि, परिषद आणि सुनावणी संबंधित इतर खर्च हे समाविष्ट आहेत (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
घोकणे पोहोच
- US$७८०.०० यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत, US$०.०० खर्च झाले आहेत.
- अर्थसंकल्पीय खर्चात स्वयंसेवकांना उपस्थित राहण्यासाठी आणि ChiCon येथे OTW चे प्रतिनिधित्व करण्यासाठी WorldCon सदस्यत्व समाविष्ट आहे (सर्व कार्यक्रम खर्च प्रवेश).
F. Coppa च्या रसिकचित्रफीतच्या इतिहासा बद्दल पुस्तकासाठी अनुदान
- US$६६०.०० यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत, US$६६०.०० खर्च झाले आहेत.
- या अनुदानासाठी पैशे OTW ला २०२० मध्ये मिळालेली एक देणगी मधून आले आहेत Francesca Coppa च्या रसिकचित्रफीतच्या इतिहासा बद्दल पुस्तकाच्या उत्पादनाच्या विशिष्ट हेतूसाठी. मिशिगन विद्यापीठ ने पुस्तक प्रकाशित केले आहे आणि ते आता ऑनलाइन विनामूल्य उपलब्ध आहे. अनुदानाची पूर्ण रक्कम खर्च होऊन त्याचा उद्देश पूर्ण झाला असल्याने आता अनुदान बंद झाले आहे.
- उर्वरित खर्च अंतिम प्रूफरीडिंग आणि पुस्तकासाठी सामग्री सारणी तयार करण्यासाठी खर्च करण्यात आला (रासिकचित्रफीत पुस्तकासाठी अनुदान खर्च प्रवेश).
निधी उभारणी
- US$८०,९६२.१५ यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत, US$४८,७९६.१५ खर्च झाले आहेत.
- आमच्या निधी उभारणीच्या खर्चांमध्ये, देणग्या आकारण्या करिता, तृतीय-पक्ष देयक प्रोसेसरद्वारे आकारले जाणारे व्यवहार शुल्क समाविष्ट आहेत; आभारदर्शक भेटवस्तूंची खरेदी आणि शिपिंग; आणि OTWचे सदस्यत्व डेटाबेस होस्ट करण्यासाठी आणि देणगीदार आणि संभाव्य देणगीदारांसह ट्रॅक संप्रेषणासाठी वापरली जाणारी साधने (निधी उभारणी खर्च प्रवेश).
प्रशासन
- US$७६,१४७.३२ यांमधून, या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत, US$२७,९८५.०४ खर्च झाले आहेत.
- OTW च्या प्रशासकीय खर्चामध्ये आपल्या वेबसाइटसाठी होस्टिंग, ट्रेडमार्क, डोमेन, विमा, कर फाईलिंग, वार्षिक आर्थिक स्टेटमेंट लेखापरीक्षण आणि, संप्रेषण, व्यवस्थापन, कूटबद्ध दस्तऐवज संचयन, आणि लेखांकन साधने समाविष्ट आहेत (सर्व प्रशासक खर्च प्रवेश).
२०२२ महसूल
- OTW संपूर्णपणे या द्वारा समर्थित आहे तुमची देणगी—आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद!
- आम्हाला दरवर्षी आमच्या बहुतेक देणग्या एप्रिल आणि ऑक्टोबरमधल्या निधी उभारणी दरम्यान मिळतात ज्या एकत्रितपणे २०२२ मध्ये आमच्या उत्पन्नाच्या सुमारे ५५% आहेत. आम्हाला देणग्या ह्या नियोक्ता जुळवणे प्रकल्पातून ही मिळतात, रॉयल्टी, Amazon Smile, आणि PayPal Giving Fund यांद्वारे देणग्या प्राप्त करतो, जे Humble Bundle आणि eBay for Charity सारख्या कार्यक्रमांमधून देणगी मिळते. जर आपण अशा वेबसाइट्सवर खरेदी करतांना आमची मदत करण्यास इच्छुक असाल, तर कृपया आपल्या पसंतीचा धर्मादाय म्हणून "Organization for Transformative Works" ची निवड करा!
- आत्तापर्यंत (३१ जुलै, २०२२ पर्यंत) US$५,१२,३५८.९० मिळाले आहेत आणि US$६,००,११८.५१ वर्षाच्या अखेरपर्यंत प्राप्त होण्याचा अंदाज आहे.
काही प्रश्न आहेत का?
जर आपल्याकडे अर्थसंकल्प किंवा OTWच्या आर्थिक बाबींविषयी काही प्रश्न असतील तर कृपया अर्थसमितीशी संपर्क साधा. आम्ही शक्य तितक्या लवकर तुम्हाला उत्तर देऊ! आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खुल्या चॅटचे आयोजन करणार. या गप्पा मात्र संपूर्णपणे इंग्रजीत होतील. या बातम्यांच्या पोस्टच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये ते कधी होईल आणि चॅटमध्ये कसे सामील व्हावे याबद्दल अधिक माहिती आहे.
२०२२ स्प्रेडशीट स्वरूपात OTW चे बजेट डाउनलोड करण्यासाठी, कृपया या दुव्याचे अनुसरण करा.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक रसिक-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्यांनी-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईट. आमच्या स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल व ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे पहा भाषांतर पृष्ठ.
